Tuesday, January 22, 2008

'रोबो' मध्ये ऐश्वर्या आणि रजनीकांतची जोडी?



(क‌र्टॆसी: वॆब् दुनिया)

रजनीकांतसोबत 'शिवाजी: द बॉस' सारखा सुपरहिट चित्रपट बनविणारा दिग्दर्शक शंकर यांनी आपल्या आगामी 'रोबोट' या चित्रपटासाठी शाहरुख खानची निवड केली होती. शाहरुख तयारही झाला होता. त्याने सात महिन्यांच्या सलग तारखा शंकरला दिल्या होत्या.
या भव्य बजेट असणार्‍या चित्रपटात काम करण्यासाठी करीना कपूरचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. पण चित्रीकरणापूर्वीच शाहरुख आणि शंकर यांच्यात मतभेद झाले आणि शाहरूखने चित्रपट सोडला. शंकरच्या या प्रोजेक्टला उशीर झाला आणि शाहरुखचे सात महिनेही वाया गेले.
आता शंकर परत हा चित्रपट बनविण्याच्या विचारात आहे. यावेळी त्यांनी आपला आवडता कलाकार रजनीकांतशी बोलणी सुरू केली आहेत. रजनीकांतने हा चित्रपट स्वीकारल्याबरोबरच सोनी पिक्चर्स या चित्रपटात पैसे लावायला तयार झाले आहेत. या चित्रपटाचे बजेट जवळपास 100 कोटी आहे.
बॉलिवूडचीची सध्याची चर्चित अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि ऐश्वर्या राय यांच्या नावांचा विचार केला जात आहे.
शंकर या चित्रपटात ऐश्वर्याला घेण्यास उत्सुक असल्याचे समजते. ऐश्वर्याला त्यांनी चित्रपटाची पटकथा ऐकविली आहे. सध्या त्याला तिच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. ती होकार देईल याची शंकरला खात्री आहे.
रजनीकांत एका एनिमेटेड चित्रपटात काम करीत आहे. हा चित्रपट त्यांची मुलगी सौंदर्या तयार करीत असून चित्रपटाचे नाव 'सुल्तान' आहे. या चित्रपटाचे बजेट दहा कोटीच्या आसपास आहे. या एनिमेटेड चित्रपटात रजनीकांत इतर चित्रपटात जे करतो तेच असणार आहे.

No comments: