Monday, June 9, 2008

शाहरूख खान, करीना कपूर सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री

येथे झालेल्या शानदार आयफा पुरस्कार सोहळ्यात बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खानला 'चक दे इंडिया' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. करीना कपूरला 'जब वुई मेट'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. 'ओम शांती ओम' मधून आश्वासक पदार्पण केलेल्या दीपिका पदुकोणला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री व 'सांवरीया'तून पदार्पण केलेल्या रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. 'चक दे इंडिया' ला सर्वाधिक नऊ पुरस्कार मिळाले. शिवाय शाहरूखच्याच 'ओम शांती ओम'लाही पाच पुरस्कार मिळाले. ए.आर.रहमान यांना 'गुरू'च्या संगीतासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार मिळाला. गोविंदा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता ठरला. 'मेट्रो'तील भूमिकेसाठी इरफान खान व कोंकणा सेन-शर्मा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता-अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. 'शूट आऊट एट लोखंडवाला'तील नकारात्मक भूमिकेसाठी विवेक ओबेरायला सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला. श्रेया घोशाल सर्वोत्कृष्ट गायिका तर शान सर्वोत्कृष्ट गायक ठरला.

Tuesday, May 6, 2008

Thursday, April 3, 2008

अमिषा पटेलनेही सोडला 'बिल्लू बार्बर'

(क‌र्टॆसी: वॆब् दुनिया) प्रियदर्शनच्या 'बिल्लो बार्बर' या चित्रपटातून तब्बू पाठोपाठ अमिषा पटेलनेही अंग काढून घेतले आहे. चित्रपटात शाहरूख खान व्यतिरिक्त इरफान खान काम करीत आहे. तब्बूने चित्रपटात इरफान असल्यामुळे काम करण्यास नकार दिला होता. तब्बू आणि इरफान यांच्यात काही दिवसांपासून अबोला आहे. तब्बूने दिलेल्या नकारानंतर प्रियदर्शनने चित्रपटात काम करण्यासाठी अमिषा पटेलशी संपर्क साधला. शाहरूख आणि इरफान यासारख्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे पटकथा न वाचताच तिने होकार दिला. मात्र पटकथेविषयी माहिती मिळाल्यानंतर आपला रोल दुय्यम दर्जाचा असून चित्रपटात फक्त नायकांनाच प्राधान्य दिले गेले आहे हे लक्षात आल्यानंतर तिनेही चित्रपटातून माघार घेणेच पसंत केले. दोन अभिनेत्रींनी नकार दिल्यानंतर कुठलीही प्रस्थापित अभिनेत्री त्यात काम करण्यास सहजासहजी तयार होणार नाही.

Tuesday, January 22, 2008

'रोबो' मध्ये ऐश्वर्या आणि रजनीकांतची जोडी?



(क‌र्टॆसी: वॆब् दुनिया)

रजनीकांतसोबत 'शिवाजी: द बॉस' सारखा सुपरहिट चित्रपट बनविणारा दिग्दर्शक शंकर यांनी आपल्या आगामी 'रोबोट' या चित्रपटासाठी शाहरुख खानची निवड केली होती. शाहरुख तयारही झाला होता. त्याने सात महिन्यांच्या सलग तारखा शंकरला दिल्या होत्या.
या भव्य बजेट असणार्‍या चित्रपटात काम करण्यासाठी करीना कपूरचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. पण चित्रीकरणापूर्वीच शाहरुख आणि शंकर यांच्यात मतभेद झाले आणि शाहरूखने चित्रपट सोडला. शंकरच्या या प्रोजेक्टला उशीर झाला आणि शाहरुखचे सात महिनेही वाया गेले.
आता शंकर परत हा चित्रपट बनविण्याच्या विचारात आहे. यावेळी त्यांनी आपला आवडता कलाकार रजनीकांतशी बोलणी सुरू केली आहेत. रजनीकांतने हा चित्रपट स्वीकारल्याबरोबरच सोनी पिक्चर्स या चित्रपटात पैसे लावायला तयार झाले आहेत. या चित्रपटाचे बजेट जवळपास 100 कोटी आहे.
बॉलिवूडचीची सध्याची चर्चित अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि ऐश्वर्या राय यांच्या नावांचा विचार केला जात आहे.
शंकर या चित्रपटात ऐश्वर्याला घेण्यास उत्सुक असल्याचे समजते. ऐश्वर्याला त्यांनी चित्रपटाची पटकथा ऐकविली आहे. सध्या त्याला तिच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. ती होकार देईल याची शंकरला खात्री आहे.
रजनीकांत एका एनिमेटेड चित्रपटात काम करीत आहे. हा चित्रपट त्यांची मुलगी सौंदर्या तयार करीत असून चित्रपटाचे नाव 'सुल्तान' आहे. या चित्रपटाचे बजेट दहा कोटीच्या आसपास आहे. या एनिमेटेड चित्रपटात रजनीकांत इतर चित्रपटात जे करतो तेच असणार आहे.