Friday, December 28, 2007

शोबिझचा नायक तुषार जलोटा --दीपक जाधव


(कर्टॆसी:वॆब् दुनिया)
हिरो बनण्यासाठी देशभरातून अनेक युवक मुंबईत येतात. पण त्यातील सर्वांचेच हिरो बनण्याचे स्वप्न तर साकार होतेच असे नाही. परंतु, शोबिझ या मुकेश भट प्रॉडक्शनचा नायक तुषार जलोटा हा तसा सुदैवीच म्हणायला हवा. या चित्रपटातील हिरो गावावरून मुंबईत येतो. मग म्युझिक रिऍलिटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेऊन एका रात्रीत स्टार होतो. तुषारच्या बाबतीत अगदी असेच घडले. तुषारने पाच वर्षे महेश भट्ट यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. कलयुग या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शन दरम्यान महेश भट यांनी त्याला सांगितले, की तुझ्या नशीबात स्टार होण्याचे सर्व गुण आहेत. त्यानंतर त्यांनीच तुषारचे नशीब बदलले. तुषार त्यांच्या शोबिझचा नायक झाला. शोबिझ उद्या (ता.२८) प्रदर्शित होत आहे. तुषार म्हणाला, की महेश भट आणि कंपनीबरोबर मी गेल्या पाच वर्षांपासून जोडलेला आहे. या दरम्यान माझा लुक व ऍक्टिंग टॅलेंट त्यांनी अचुक हेरले. तसे मला आधीपासूनच हिरो बनायचे होते, पण संधी मिळाली नाही. अखेर सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका साकारत मी माझ्या मूळ उद्दीष्टापर्यंत पोहोचलो. शोबिझमध्ये रोहन आर्य या मध्यवर्ती भूमिकेत मी आहे. ही भूमिका आव्हानात्मक आहे. विशेष फिल्मस्‌ बॅनर्ससोबत काम करण्याचा माझा अनुभव चांगला आहे. एका कुटूंबाप्रमाणे आम्ही सर्व रहातो. १८ तास काम करूनही कधी कंटाळा येत नाही. इथे शिकायला देखील खूप मिळते. आधीपासूनच मी सेटवर खूप वेळ घालवायचो. तिथे जे काही शिकलो, त्याचा फायदा आता झाला. नायिका मृणालिनी ही एक चांगली कलाकार आहे. आमचे टयुनिंग चांगले जमल्याने शॉट लवकर ओके होतो. दोघे पहिल्यांदाच एकत्र येत असूनही गोंधळलो नाही. सर्व काही मनासारखे झाले.

Wednesday, December 26, 2007

अनिल कपूरचा वाढदिवशी 'वेलकम' केक


(क‌र्टॆसी:वॆब् दुनिया)
ख्रिसमस पंचवीस डिसेंबरला व बरोबर एक दिवस अगोदर म्हणजे चोवीस तारखेला अनिल कपूरचा वाढदिवस. अनिलचा वाढदिवस साजरा करण्यासाठी स्टुडिओ 18 ने 'वेलकम' लिहीलेला भलामोठा केक बनवला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत विविधांगी भूमिका करून अभिनयाचा ठसा उमटवणारा अनिल आजही चित्रपटातून तेवढीच धमाल करतो. आजचा त्याचा अठ्ठेचाळीसावा वाढदिवस मात्र चिरतारूण्य लाभलेल्या अनिलवर वयाचा काहीही परिणाम जाणवत नाही. त्याच्या अभिनयात आजही तेवढीच उत्फूर्तता आहे. सद्या त्याने चित्रपट निर्मिती संस्थेवर लक्ष केंद्रीत केले असून दर्जेदार चित्रपटनिर्मिर्तीचा त्याचा इरादा आहे. 'गांधी माय फादर' सारखा चित्रपट करून त्याने त्याची साक्षही पटवली आहे. अनिल कपूरची भूमिका असलेला 'वेलकम' नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातही त्याचा अभिनय नेहमीसारखाच खुलला आहे.

Tuesday, December 25, 2007

प्रियांका का अफवांनी त्रस्त


(क‌र्टॆसी:वॆब् दुनिया)
अभिनेत्री प्रियांका चोपडाची हरमन बावेजासोबत खास मैत्री आहे. मात्र त्यांच्याबाबत प्रसारमाध्यमात वेगळीच चर्चा आहे. त्यांच्यामधील मैत्रीस प्रेमकरणाचे स्वरूप देण्यात आल्याने प्रियांका चांगलीच त्रस्त आहे. हरमनच्या 'लव स्टोरी 2050' मध्ये करीना कपूरने अंतिम क्षणी काम करण्यास नकार दिल्याने मैत्रीसाठी प्रियांकाने चित्रपटात भूमिकेस होकार दिला. प्रियांकाच्या मते फक्त मैत्रीसाठीच भूमिका स्विकारली नसून कथानकाकडेही लक्ष दिले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर सुरूवातीच्या दिवसात तथ्यहीन गॉसीपमुळे आपणास चांगलाच त्रास व्हायचा, कित्येकदा डोळ्यात अश्रू यायचे. चित्रपटसृष्टीत स्थिरावल्यानंतर आता आपणांस असल्या चर्चेची सवय झाली आहे. याबाबत प्रियांकास कुटुंबीयांचा चांगलाच आधार मिळाला असून त्यांनी नेहमीच प्रियांकावर विश्वास ठेवला आहे. याचा तिला सार्थ अभिमान आहे.

Monday, December 24, 2007

'तारे जमीं पर' रिव्यू







मुले देवाघरची फुले असं म्हटलं जातं. मुले अळवावरच्या पाण्यासारखी पारदर्शक आणि पान झुकेल तिकडे घरंगळत जाणाऱ्या बिंदूंसारखी असतात. पण मुलांना त्यांचं बालपण तितक्या नैसर्गिकपणे जगण्याचा काळ आता राहिला नाही. स्पर्धात्मक जगात मूल एक उत्पादन झालं आहे, जे सगळ्या क्षेत्रात चमकलं पाहिजे, अशी पालकांची अपेक्षा असते. पालकांचा महत्त्वाकांक्षी स्वभाव आणि स्पर्धात्मक मानसिकतेने या मुलांचे मूलपण चुरगाळून टाकले आहे. त्यामुळे या लहानग्यांच्या मनाचा थांग घेतलाच जात नाही. त्यांना काय वाटते? ते काय करू इच्छितात? त्यांची स्वप्न काय आहेत?
नेमक्या याच प्रश्नांना अमिर खानने त्याच्या तारे जमीं पर या चित्रपटात स्पर्श केला आहे. चित्रपटाच्या प्रोमोजमधून हा मुलांसाठीचा चित्रपट वाटण्याची दाट शक्यता आहे. पण तसे समजण्याची चुक करू नका. हा मुलांचा, पालकांचा, शिक्षकांचा आणि पर्यायाने समाजासाठीचाच चित्रपट आहे. कारण या प्रत्येक घटकासाठी यात काही ना काही आहे, जे त्याला विचार करायला भाग पाडेल.
इशान अवस्थी (दर्शील सफारी) या आठ वर्षाच्या मुलाचे मन अभ्यासापेक्षा कुत्रा, मासे आणि चित्रकला यात अडकले आहे. पण त्याचे आई-वडील त्याला सारखे अभ्यास कर अभ्यास कर असे टुमणे लावत असतात. पण इशानला मनापासून ते करावेसे वाटत नाही. त्यामुळे आई-वडिल आणि शिक्षकांची बोलणी खाणे हे त्याच्या आयुष्यातील नैमित्तिक काम बनते. त्याला सुधारण्यासाठी अखेर आई- वडिल त्याला निवासी शाळेत (बोर्डींग स्कूल) टाकण्याचा निर्णय घेतात.
हसता खेळता इशान तेथे गेल्यावर कोमेजून जातो. उदास होतो. पण त्याचवेळी शाळेत नवीन आलेले कलाशिक्षक रामशंकर निकुंभ (अमिर खान) यांचे त्याच्याकडे लक्ष जाते. ते त्याच्या उदासपणाचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांच्या लक्षात येते, की इशान प्रतिभावंत आहे, पण त्याला डिसलेक्सिया नावाचा आजार आहे. त्यामुळे त्याला वाचण्यात अडचण येते. त्यानंर मग त्याला प्रेम, जिव्हाळा देऊन निकुंभ सर त्याच्यात दडलेली हुषारी सर्वांच्या समोर आणतात.
कथा अतिशय सोपी, सरळ आहे. ती पडद्यावर सादर करायलाही तितकीच कठीण आहे. पण अमिरने त्याच्या दिग्दर्शकीय पदार्पणातच त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने पडद्यावर सादर केले आहे. पटकथा अतिशय बांधीव आहे. त्यामुळे इकडे तिकडे भरकटायचा प्रश्नच येत नाही. छोट्या छोट्या प्रसंगातून प्रेक्षकांच्या ह्रदयाला हात घालण्यात ती यशस्वी ठरते.
इशानचे शाळा सोडून रस्त्यावर भटकत रहाणे, ताजी हवा भरभरून श्वासात घेणे, इमारती रंगीत होताना पहाणे, फुटपाथवर रहाणारी मुले कोणत्याही दडपणाविना मुक्तपणे खेळत असलेली पहाणे, बर्फाचा लाडू खाणे ही सारी लहानपण दर्शविणारी दृश्ये पाहिल्यावर कुणालाही आपले बालपण आठवेल.
इशानचे शाळा सोडून रस्त्यावर भटकत रहाणे, ताजी हवा भरभरून श्वासात घेणे, इमारती रंगीत होताना पहाणे, फुटपाथवर रहाणारी मुले कोणत्याही दडपणाविना मुक्तपणे खेळत असलेली पहाणे, बर्फाचा लाडू खाणे ही सारी लहानपण दर्शविणारी दृश्ये पाहिल्यावर कुणालाही आपले बालपण आठवेल.
पण त्याचबरोबर आपली स्वप्ने मुलाच्या डोळ्यातून पाहणारे, आपल्या महत्त्वाकांक्षा मुलांवर लादणाऱ्या आई-बापांनाही ही कथा आत्मपरिक्षण करायला लावते. मुलांवर आपल्या महत्त्वाकांक्षा लादणे बालकामगारापेक्षा वाईट आहे, यासारखे संवाद पालकांनाही विचार करायला भाग पाडतात.
काही प्रसंगही छान गुंफले आहेत. इशान टेनिस स्पर्धेच्या एका अंतिम सामन्यात हरतो. त्यावेळी त्याचे वडील त्याला खूप बोलतात. पण तोपर्यंतच्या त्याच्या प्रवासासाठी त्याच्या पाठीवर शाबासकी देत नाहीत. उलट बोलून त्याच्या कष्टांवर पाणी फिरवतात.
हा चित्रपट पालकांना अंतर्मुख करतो. अनेक प्रश्न विचारतो. त्यांनी मुलांना केवळ त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जन्म दिला आहे का? आयुष्यात त्यांना जे व्हायचे ते स्वतः झाले का? नसतील झाले तर त्याचा राग मुलांवर काढण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? मुळात मुलाचा कल काय याचा त्यांनी विचार केला का? असे अनेक प्रश्न पालकांना हा चित्रपट नकळत विचारतो.
संवादाच्या माध्यमातून अमिरने हे प्रश्न विचारले आहेत. पण चित्रपट उपदेशपर किंवा काही तरी संदेश देण्याच्या अविर्भावत तयार करण्यात आलेला नाही. चित्रपट पाहतानाच प्रेक्षक आपोआप अंतर्मुख होतात. त्यानंतर ते नक्कीच आपल्या मुलांना अधिक चांगल्या पद्दतीने समजावून घेऊ शकतील.
इशान झालेला दर्शील सफारीने कल्पनातीत काम केले आहे. तो अभिनय करतो असे वाटत नाही, एवढी सफाई त्याच्या कामात आहे. लहान मुलांचे सर्व भाव त्याच्या चेहऱ्यावर इतके छान दिसतात, की त्याच्या क्षमतेचे आश्चर्य वाटते. हसता खेळता इशान राग, लोभ, जवळीक, उदासपण या भावनाही तितक्याच चांगल्या रितीने व्यक्त करतो.
अमिर खान तर मध्यंतरानंतर चित्रपटात येतो आणि प्रभावी ठरतो. टिस्क चोप्राने (इशानची आई) आईपण छान सादर केले आहे. विपिन शर्मा (इशानचे वडील), सचेत इंजिनियर यांचेही काम छान आहे.
कोणत्याही तयारीविना दिग्दर्शकीय आखाड्यात उतरलेल्या आमिरने आपण एक चांगले दिग्दर्शक आहोत, हे दाखवून दिले आहे. या माध्यमावरची त्यांची पकड असल्याचे जाणवते. फालतू म्हणावं असे या चित्रपटात काहीही नाही. मुलांवरही एक चांगला चित्रपट बनविता येतो आणि तो बालचित्रपट नसतो हे त्याने दाखवून दिले आहे. खटकण्यासारखी बाब एकच आहे, ती म्हणजे चित्रपटाची लांबी. ती थोडी जास्त असल्यासारखी वाटते, इतकंच.
चित्रपटातील गाणीही छान, अर्थवाही आहेत. तशाच चालीही शंकर-एहसान-लॉय यांनी दिल्या आहेत. पडद्यावर पाहताना त्यांचा प्रभाव आणखी वाढतो. छायाचित्रणही उल्लेखनीय.
हा चित्रपट आवर्जून पाहिला पाहिजे. पालकांनी तर अगदी आवर्जून पाहिला पाहिजे. अगदी मुलांबरोबर जाऊन. मुलाला समजून घेण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
निर्माता- दिग्दर्शक- अमिर खानगीतकार- प्रसून जोशीसंगीत- शंकर-एहसान-लॉयकलावंत- अमिर खान, दर्शील सफारी, टिस्का चोप्रा, विपिन शर्मा, सचेत इंजिनियर.

Saturday, December 22, 2007

'ट्रेन' रूळावर आणण्यासाठी सायलीला 'गुडलक'


(क‌र्टॆसी: वॆब् दुनिया)
मूळची नाशिकची असलेली (आपली) सायली भगत द ट्रेन या चुंबनफेम इरफान हाशमीबरोबर केलेल्या चित्रपटानंतर गायबच झाली होती. पण आता ती लवकरच दिसणारेय. आदित्य दत्ता दिग्दर्शित गुडलक नावाच्या चित्रपटातून ती रसिकांसमोर येतेय. या वर्षी आलेल्या द ट्रेन या आपल्या नमनाच्या चित्रपटातच सायलीने आईची भूमिका केली. आता पहिल्याच चित्रपटात आई झाल्यावर मग पुढे काय उरते? २००४ मध्ये मिस इंडिया झालेल्या सायलीने पहिला चित्रपट आईच्या भूमिकेसाठी स्वीकारावा हे थोडे विचित्रच ना. पण सायलीच्या मते भूमिका चांगली होती, म्हणून तिने हा चित्रपट स्वीकारला. अर्थात तरीही सायलीची स्टार व्हॅल्यू निर्माण व्हायला लागलीय. म्हणूनच गुडलक सारखा चित्रपट तिला मिळाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांनी यापूर्वी आशिक बनाया आपने हा चित्रपट केला होता. गुडलकमध्ये सायली एका पीआरओची भूमिका करतेय. हा एक कॉमेडीपट आहे. हा चित्रपट नक्की चालेल असे सायलीला वाटते. या चित्रपटात आर्यमन रामसे सायलीबरोबर आहे. दोघे एकमेकांचे चांगले मित्र बनले आहेत. त्यांच्यात काही तरी सुरू असल्याचीही चर्चा आहे. पण सायली बिचारी त्याचा इन्कार करते आहे.

Friday, December 21, 2007

सेलिना, इशाला आता हॅलो डार्लिंगची आशा



सेलिना जेटली, इशा कोप्पीकर आणि गुल पनाग आता सुभाष घई यांच्या मुक्ता आर्टच्या हॅलो डार्लिंग या चित्रपटात काम करणार आहेत. घई यांनी या तिघींना घेऊन चित्रपट तयार करण्याची घोषणा केली आहे. सेलिना आणि इशा दोघीही आतापर्यंत फ्लॉप ठरलेल्या अभिनेत्री आहेत. त्यामुळे त्या यशाच्या शोधात आहेत. मुक्ता आर्टचा हा चित्रपट कदाचित त्यांची कारकिर्द उंचावू शकतो. चित्रपटाचे कथानक तीन नायिका आणि एका खलनायकाभोवती फिरते. खलनायकाच्या भूमिकेत जावेद जाफरी असेल. राजपाल यादव, चंकी पांडे व सनी देओल पाहुणे कलाकार असतील. दिग्दर्शन मनोज तिवारी करणार असून प्रीतमचे संगीत असेल. सुभाष घई सध्या घाऊक प्रमाणात चित्रपट बनवत आहेत. सलमान व कैतरीना कैफला घेऊन ते युवराज चित्रपट तयार करत आहेत. याशिवाय ब्लॅंक अँड व्हाईट, बॉम्बे टु बॅंकॉक, सायकल किक व राईट या रॉंग हे चित्रपटही या बॅनरखाली तयार केले जात आहेत. सनी व बॉबी यांना घेऊनही लवकरच एक चित्रपट बनविला जाणार आहे. अभिषेक बच्चनला हॉलीवूडमध्ये भूमिका मिळवून देण्यासाठी ऐश्वर्या तिचा शब्द टाकत असल्याचे बोलले जात आहे. पण या सगळ्या अफवा आहेत, असे सांगून ती म्हणाली, अभिषेक स्वतः एक चांगला अभिनेता आहे. त्यामुळे तो स्वतःच्या बळावर भूमिका मिळवू शकतो. त्यासाठी माझी आवश्यक्ता नाही. हॉलीवूडमध्ये स्थायिक होण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे सांगून, मी बॉलीवूडमध्येच रहाणार असल्याचेही तिने स्पष्ट केले.

Thursday, December 20, 2007

बावीस लाख काचेच्या तुकड्यांचा काचमहाल




(कर्टेसी: वेब दुनिया)

मुगल-ए-आझम पाहिलेल्यांना त्यातील प्यार किया तो डरना क्या हे गाणं नक्की आठवत असेल. (मुळात हे गाणंच अविस्मरणीय असल्याने या वाक्याला तसा काही अर्थ नाहीये.) पण या गाण्याबरोबरच त्यासाठी उभारलेला काचेच्या महालाचा सेटही आठवतो. मधुबाला या काचमहालात नाचली होती. दिग्दर्शक के. असीफ यांनी हा काचमहाल उभारण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. असेच आता दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर करतो आहे. जोधा अकबर या चित्रपटासाठी आशुतोष आता काचमहाल उभारतो आहे. ह्रतिक रोशन व ऐश्वर्या राय यात काम करीत आहेत. अर्थातच नितिन देसाई हे प्रख्यात कला दिग्दर्शक हा सेट उभारत आहेत. सेटसाठी २२ लाख १२ हजार २२१ काचेचे तुकडे व आरशांचा उपयोग करण्यात आला आहे. या सेटवर गाणेही चित्रित करण्यात आले. यूटीव्हीद्वारे या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. चित्रपटाच्या प्रोमोतूनही त्याची भव्यता दिसून येते आहे. २५ जानेवारीला हा चित्रपट रिलिज होणार आहे.

Wednesday, December 19, 2007

सामाजिक जाणीवेचा जॉन अब्राहम


(कर्टेसी: वेब दुनिया)


जॉन अब्राहमचा वाढदिवस सोमवारी झाला. सध्या युवकांची त्यातही मुलींची धडकन असणारा जॉन समाजाप्रती संवेदनशीलही आहे, हे फार कमी जणांना ठाऊक आहे. अनेक सामाजिक कामात त्याचा सहभाग असतो. त्याने आपल्या काही सहकाऱ्यांच्या साथीने देशातील काही गावांत पाच हजार घरे बांधली आहेत. विशेष म्हणजे ही घरे अतिशय दुर्गम भागात आहेत. जॉन म्हणतो, की माझे फिल्मी जग आणि सामाजिक कार्य या दोन्हीत मी अंतर राखून आहे. चित्रपटातून वेळ मिळाला की मी या कामात लक्ष घालतो. प्राण्यांच्या प्रती प्रेम असल्याने पेटासाठी काम करतो. जॉनची स्वतःची एक संस्था आहे, ती जॉन ब्रिगेड या नावाने ओळखली जाते. हॅबिटेट फॉर ह्युमनिटी या अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या संस्थेसाठी काम करते. पुढच्या वर्षी जॉनची निराश्रितांसाठी आठ हजार घरे बांधण्याची योजना आहे. या कामात युवकांनी जास्तीत जास्त सहभाग द्यावा अशी जॉनची इच्छा आहे. युवकांनी पुढे येऊन घरे बांधण्याच्या कामात सहकार्य करावे असे त्याला वाटते. थोडं त्याच्या चित्रपटाविषयी. करण जोहरच्या एका चित्रपटात जॉनने काम केले आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. ही छान मनोरंजन करणारी कॉमेडी आहे. दीपा मेहता यांच्या लूनातही तो काम करतो आहे. शिवाय श्रीराम राघवन यांच्या हॅपी बर्थ डे मध्येही तो आहे.

Tuesday, December 18, 2007

शाहिद-करीना परत एकत्र


(कर्टेसी:वेब दुनिया)
व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर शाहिद कपूर आणि करीना कपूर म्हणे एकत्रित लोकांसमोर येणार आहेत. म्हणजे दोघांचं फाटलेलं शिवलं गेलं असा याचा अर्थ नाही. तर त्यांचा एक चित्रपट या दिवशी प्रदर्शित होतोय. मिलेंगे मिलेंगे असं या चित्रपटाचं नाव. त्यात दोघेही प्रमुख भूमिकांत आहेत. खरं तर हा चित्रपट खूप आधीपासून तयार आहे. पण प्रदर्शित करायला त्याला मुहूर्त सापडलेला नाहीये. या दोघांचा जब वुई मेट हीट ठरल्यानंतर मिलेंगे मिलेंगेचा निर्माता बोनी कपूर उत्साहीत झालाय. या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केलंय. सतीशच्या मते चित्रपट तयार व्हायला वेळ लागला तरी त्याच्या कथेवर त्याचा काहीही परिणाम होणार नाहीये. शाहीद व करीना या दोघांनीही अद्याप चित्रपटाचे डबिंग केलेले नाही. ते दोघेही या चित्रपटाबद्दल खुष नाही, असे ऐकिवात येतेय. पण बोनी व सतीश यांनी याचा इन्कार केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे दोघेही लवकरच याचे डबिंग पूर्ण करणार आहेत. त्यानंतर व्हॅलेंटाईन डे ला चित्रपट प्रदर्शित केला जाईल.

Monday, December 17, 2007

अपयशाने माधुरी निराश झालेली नाही


(कर्टेसी: वेब्दुनिया)
माधुरी दीक्षित अभिनित आजा नच ले बॉक्स ऑफिसवर दणकून आदळला. समीक्षकांनी कौतुक केले असले तरी प्रेक्षकांना आकर्षून घेण्यास चित्रपट कमी पडला. या अपयशाचे माधुरीला दुःख झाले असले तरी ती निराश झालेली नाही. माधुरीच्या मते पुनरागमनासाठी आजा नच ले सारखा चांगला चित्रपट नव्हता. नेहमीच्या चित्रपटांपेक्षा याचा विषय़ वेगळा होता. चित्रपटात नायक नसला तरी इतर चांगले कलाकार त्यात होते. त्यांच्या भूमिकाही सशक्त होत्या. चित्रपट का चालला नाही, याचे कारण मात्र तिच्याकडेही नाही.

Saturday, December 15, 2007

जाने कहॉं गये वो दिन (राज कपूर जयंतीविशेष)











(कर्टेसी: वेब दुनिया )
बॉलीवूडमधील शोमॅन राज कपूर यांची आज ८३ वी जयंती. चित्रपट हाच श्वास असलेला हा चित्रकर्मी आज जिवंत असता तरी आपला नातू रणबीर कपूरला लॉंच करण्यसाठी चित्रपट तयार करत असता. राज कपूर जाऊन १९ वर्षे झाली, पण जाने कहॉं गये वो दिन कहते थे तेरी याद में अशीच मनाची भावावस्था आहे. राज कपूरचे चित्रपट आजच्या सारखे चमकत्या दुनियेचे प्रतिनिधीत्व करणारे नव्हते. मनोरंजनाआड काही तरी संदेश त्यातून दिला जात असे. आधी हकीकत आधा फसाना अशी त्यांची शैली होती. सामान्य माणासाला नायक बनवून त्या माध्यमातून त्यांनी आपल्याला जे सांगायचे आहे, ते सांगितले. आजही त्यांचे चित्रपट देशविदेशातील विविध चित्रपट महोत्सवात दाखविले जातात, याचे कारण हेच आहे. राज कपूर यांच्याविषयी सर्वांनाच माहिती आहे. पण इथे त्यांच्याविषयीचे काही वेगळे पैलू दाखविण्याचा प्रयत्न आहे.
राजला आणखी दोन भाऊ होते
राज कपूर यांची बहिण उर्णिला, भाऊ शम्मी व शशी यांच्याशिवाय त्यांना रवींद्र व देवेंद्र नावाचे दोन भाऊ होते. पण त्यांचा लहान वयातच मृत्यू झाला होता. रवींद्रने चुकून उंदरांना मारण्याचे विष प्यायले होते. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर त्यानंतर आठवड्याच्या आत देवेंद्रही न्युमोनियामुळे मृत्युमुखी पडला. त्यानंतर शम्मी व शशी कपूर यांचा जन्म झाला. राज कपूर यांना शम्मी फार आवडायचा. शम्मीला नायक म्हणून त्यांच्या चित्रपटात घ्यायची त्यांची खूप इच्छा होती. पण शम्मीची याहू इमेज राज यांच्या चित्रपटातील भूमिकांशी जुळत नव्हती. पण शेवटच्या काळात प्रेमरोगमध्ये अखेर शम्मीने काम केले.
आर. के. चा लोगो
आर. के. बॅनरच्या लोगोत एक माणूस एका हाताने व्हायोलिन वाजवतोय व दुसऱ्या हातात एक स्त्री झुलते आहे, असे दाखविले आहे. हा लोगो बरसात या चित्रपटातील एका प्रसंगातून घेतला आहे. या प्रसंगावर आधारीत चित्र होते. ते राज यांना खूप आवडले. कारण एका हातात संगीत व दुसऱ्या हातात सौंदर्य होते. राज या दोन्हीचे भोक्ते होते. म्हणूनच त्यांनी या चित्राला आपल्या बॅनरचा लोगो बनविले.
राज कपूरचा नायक- सामान्य माणूस
राज यांच्या चित्रपटांतील नायक हा सामान्य माणूस आहे. फुटपाथवर रहाणारे, फेरीवाले, चहा विकणारे त्यांच्या चित्रपटात सर्रास आढळतात. हे काही गरीबीचे उदात्तीकरण वा स्वतः ऐषोआरामात राहून गरीबी पहायची यातून आले नव्हते. वास्तविक राज स्वतः अत्यंत साधे होते. महागड्या हॉटेलऐवजी ते नेहमी चौकातल्या एखाद्या चहाच्या दुकानावर किंवा ढाब्यावर जायचे. त्यामुळे खरीखुरी मंडळी त्यांना भेटायची.त्यांची सुख दुःख त्यांना समजायची. त्यांच्या चित्रपटाचा हा प्रेरणास्त्रोत होता. ते म्हणायचे देखिल, मी सामान्यांसाठी चित्रपट तयार करतो. त्यामुळे त्यांच्यात वेळ घालविणे मला आवडते.
सत्यजित राय यांचा प्रभाव
राज चोरी चोरीचे शूटींग तत्कालीन मद्रासमध्ये करत होते, त्यावेळची गोष्ट. सत्यजीत राय दिग्दर्शित पथेर पांचाली या चित्रपटासंदर्भात त्यांनी ऐकले होते. त्यावेळी मद्रासमध्ये हा चित्रपट दाखवला जात होता. राज यांनी चित्रपट पाहिला आणि दोन दिवस ते त्या प्रभावातून बाहेर येऊ शकले नाहीत. नंतर ते सत्यजीत राय यांना भेटलेसुद्धा. त्यांना आर. के. बॅनरसाठी चित्रपट बनवायला सांगितले. पण राय यांना हिंदी येत नव्हती. त्यामुळे हे शक्य झाले नाही.
कानाखाली आवाज काढल्यानंतर.....
पृथ्वीराज कपूर यांचा समृद्ध वारसा राज यांना लाभला होता. त्यांनी सुरवातीपासूनच अभिनयापेक्षा चित्रपटाच्या इतर तांत्रिक अंगात रूची दर्शवली होती. म्हणून पृथ्वीराज यांनी त्यांना यासंदर्भात मार्गदर्शनासाठी केदार शर्मा यांच्याकडे पाठविले. पृथ्वीराज हे स्वतः राज यांच्यासाठी चित्रपट तयार करू शकत होते, पण मुलाने या व्यवसायाची सुरवात अगदी अबकडईपासून करावी अशी त्यांची इच्छा होती. केदार शर्मा यांच्या चित्रपटात राज यांना क्लॅपर बॉयचे ( शॉटसाठी फटमार करणारी मुले) काम मिळाले.
शॉट सुरू होण्यापूर्वी राज केसात कंगवा फिरवून क्लॅप देत असत. केदार यांनी त्यांना अनेकदा सांगितले, की त्यांना चित्रपटात दाखवयाचे नाहीये. त्यामुळे उगाचच केस विंचरण्याची गरज नाही. पण राज त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असे.
एकदा त्यांनी क्लॅपर पट्टी एकमेकांवर एवढ्या जोरात आदळली की त्याच्याजवळ उभ्या असलेल्या एका अभिनेत्याची नकली दाढी त्यात अडकून ती खाली पडली. हे पाहून केदार शर्मा भडकले. त्यांनी एक सणसणीत थप्पड राजच्या गालावर ठेवून दिली. पुढे याच केदार शर्मा यांनी राज यांना नीलकमल या चित्रपटात नायकाची भूमिका दिली. यासंदर्भात पुढे केदार शर्मांनी म्हणून ठेवलंय, राजच्या डोळ्यांत त्या दिवशी जे दुःख अगदी खोलवर दिसत होते. त्यामुळे मी आतून हललो. प्रभावित झालो. थोडक्यात एका थप्पडीने राज यांच्या चित्रकारकिर्दीचा प्रवास सुरू झाला.

Friday, December 14, 2007

कानामागून आली अन् तिखट झाली



(कर्टेसी : वेब दुनिया )


यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या चित्रपटात रणबीर कपूरसोबत बिपाशा बासू आणि दीपिका पदुकोण काम करीत आहेत. एकाच चित्रपटात दोन किंवा तीन नायिका काम करतात, त्यावेळी त्यांच्यात स्पर्धा निर्माण होणे अगदी स्वाभाविक आहे. 'वेलकम' या आगामी चित्रपटात मल्लिका शेरावत आणि कैतरीना कैफ यांच्यातही सारखे वाजत होते, अशी वदंता आहे. तसेच आता बहुधा दीपिका आणि बिपाशा यांच्यातही होत आहे. बिपाशा बॉलीवूडमध्ये स्थिरावली आहे. नुकताच तिला सेक्सी आशियाई महिला म्हणून गौरविण्यातही आले. त्या तुलनेत दीपिकाचा फक्त एकच चित्रपट आला आहे. पण लोकप्रियतेत ती वरचढ ठरली आहे. थो़क्यात कानामागून येऊन दीपिका तिखट झाल्याचे बिपाशाला वाटते. या दोघीही तरूण वर्गांत आवडत्या आहेत. कोणत्याही बाबतीत दीपिकाच्या तुलनेत कमी पडू नये म्हणून बिपाशा प्रयत्न करीत आहे. म्हणूनच तीने आपला फिगर जपण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटात बिपाशाची भूमिका एका ग्लॅमरस मुलीची आहे. अर्थात दोघींत वाद असो वा नसो, पण दोघींचे चाहते मात्र चित्रपटाला जाऊन त्याचा फायदा चित्रपटाला नक्कीच होईल. नाही का?

Thursday, December 13, 2007

"मै फास्ट ब्रेक" पी एस टी एल चेरमेन नटराजन

पिरमिड द्वारा रिलीज "हलला बॉल" प्रेस क्‍लिप्पीअम्ग्ज़









पिरमिड सायिमीरा थियेटर लिमीटेड फरीदाबाद शापिंग माळ


The mall is situated near Badhpur, which is 18 Kms from Delhi. It is a newly generated planned area. The mall is completely filled with state-of-art facilities and with modern technologies that is equivalent to inox and other multiplexes. The mall is called as SLF mall.The mall is having a total of three screens with a seating capacity of- 234, 146 & 146. Prominent feature is a modern food court with so many varieties of food and a multicuisine one too. Packed with diet foodThe mall is surrounded by 1,400 houses, with a population of 13,500 people and also with 270 factories around it. The mall is in indraprastha colony.
Side View
Entrance
Passage
Food Court
Canteen
Auditorium
President (Marketing) with Staff

Staffs participating in a Conversation