Monday, June 9, 2008

शाहरूख खान, करीना कपूर सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री

येथे झालेल्या शानदार आयफा पुरस्कार सोहळ्यात बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खानला 'चक दे इंडिया' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. करीना कपूरला 'जब वुई मेट'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. 'ओम शांती ओम' मधून आश्वासक पदार्पण केलेल्या दीपिका पदुकोणला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री व 'सांवरीया'तून पदार्पण केलेल्या रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. 'चक दे इंडिया' ला सर्वाधिक नऊ पुरस्कार मिळाले. शिवाय शाहरूखच्याच 'ओम शांती ओम'लाही पाच पुरस्कार मिळाले. ए.आर.रहमान यांना 'गुरू'च्या संगीतासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार मिळाला. गोविंदा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता ठरला. 'मेट्रो'तील भूमिकेसाठी इरफान खान व कोंकणा सेन-शर्मा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता-अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. 'शूट आऊट एट लोखंडवाला'तील नकारात्मक भूमिकेसाठी विवेक ओबेरायला सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला. श्रेया घोशाल सर्वोत्कृष्ट गायिका तर शान सर्वोत्कृष्ट गायक ठरला.