Tuesday, December 18, 2007

शाहिद-करीना परत एकत्र


(कर्टेसी:वेब दुनिया)
व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर शाहिद कपूर आणि करीना कपूर म्हणे एकत्रित लोकांसमोर येणार आहेत. म्हणजे दोघांचं फाटलेलं शिवलं गेलं असा याचा अर्थ नाही. तर त्यांचा एक चित्रपट या दिवशी प्रदर्शित होतोय. मिलेंगे मिलेंगे असं या चित्रपटाचं नाव. त्यात दोघेही प्रमुख भूमिकांत आहेत. खरं तर हा चित्रपट खूप आधीपासून तयार आहे. पण प्रदर्शित करायला त्याला मुहूर्त सापडलेला नाहीये. या दोघांचा जब वुई मेट हीट ठरल्यानंतर मिलेंगे मिलेंगेचा निर्माता बोनी कपूर उत्साहीत झालाय. या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केलंय. सतीशच्या मते चित्रपट तयार व्हायला वेळ लागला तरी त्याच्या कथेवर त्याचा काहीही परिणाम होणार नाहीये. शाहीद व करीना या दोघांनीही अद्याप चित्रपटाचे डबिंग केलेले नाही. ते दोघेही या चित्रपटाबद्दल खुष नाही, असे ऐकिवात येतेय. पण बोनी व सतीश यांनी याचा इन्कार केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे दोघेही लवकरच याचे डबिंग पूर्ण करणार आहेत. त्यानंतर व्हॅलेंटाईन डे ला चित्रपट प्रदर्शित केला जाईल.

No comments: