Saturday, December 22, 2007

'ट्रेन' रूळावर आणण्यासाठी सायलीला 'गुडलक'


(क‌र्टॆसी: वॆब् दुनिया)
मूळची नाशिकची असलेली (आपली) सायली भगत द ट्रेन या चुंबनफेम इरफान हाशमीबरोबर केलेल्या चित्रपटानंतर गायबच झाली होती. पण आता ती लवकरच दिसणारेय. आदित्य दत्ता दिग्दर्शित गुडलक नावाच्या चित्रपटातून ती रसिकांसमोर येतेय. या वर्षी आलेल्या द ट्रेन या आपल्या नमनाच्या चित्रपटातच सायलीने आईची भूमिका केली. आता पहिल्याच चित्रपटात आई झाल्यावर मग पुढे काय उरते? २००४ मध्ये मिस इंडिया झालेल्या सायलीने पहिला चित्रपट आईच्या भूमिकेसाठी स्वीकारावा हे थोडे विचित्रच ना. पण सायलीच्या मते भूमिका चांगली होती, म्हणून तिने हा चित्रपट स्वीकारला. अर्थात तरीही सायलीची स्टार व्हॅल्यू निर्माण व्हायला लागलीय. म्हणूनच गुडलक सारखा चित्रपट तिला मिळाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांनी यापूर्वी आशिक बनाया आपने हा चित्रपट केला होता. गुडलकमध्ये सायली एका पीआरओची भूमिका करतेय. हा एक कॉमेडीपट आहे. हा चित्रपट नक्की चालेल असे सायलीला वाटते. या चित्रपटात आर्यमन रामसे सायलीबरोबर आहे. दोघे एकमेकांचे चांगले मित्र बनले आहेत. त्यांच्यात काही तरी सुरू असल्याचीही चर्चा आहे. पण सायली बिचारी त्याचा इन्कार करते आहे.

No comments: