सेलिना जेटली, इशा कोप्पीकर आणि गुल पनाग आता सुभाष घई यांच्या मुक्ता आर्टच्या हॅलो डार्लिंग या चित्रपटात काम करणार आहेत. घई यांनी या तिघींना घेऊन चित्रपट तयार करण्याची घोषणा केली आहे. सेलिना आणि इशा दोघीही आतापर्यंत फ्लॉप ठरलेल्या अभिनेत्री आहेत. त्यामुळे त्या यशाच्या शोधात आहेत. मुक्ता आर्टचा हा चित्रपट कदाचित त्यांची कारकिर्द उंचावू शकतो. चित्रपटाचे कथानक तीन नायिका आणि एका खलनायकाभोवती फिरते. खलनायकाच्या भूमिकेत जावेद जाफरी असेल. राजपाल यादव, चंकी पांडे व सनी देओल पाहुणे कलाकार असतील. दिग्दर्शन मनोज तिवारी करणार अ
सून प्रीतमचे संगीत असेल. सुभाष घई सध्या घाऊक प्रमाणात चित्रपट बनवत आहेत. सलमान व कैतरीना कैफला घेऊन ते युवराज चित्रपट तयार करत आहेत. याशिवाय ब्लॅंक अँड व्हाईट, बॉम्बे टु बॅंकॉक, सायकल किक व राईट या रॉंग हे चित्रपटही या बॅनरखाली तयार केले जात आहेत. सनी व बॉबी यांना घेऊनही लवकरच एक चित्रपट बनविला जाणार आहे. अभिषेक बच्चनला हॉलीवूडमध्ये भूमिका मिळवून देण्यासाठी ऐश्वर्या तिचा शब्द टाकत असल्याचे बोलले जात आहे. पण या सगळ्या अफवा आहेत, असे सांगून ती म्हणाली, अभिषेक स्वतः एक चांगला अभिनेता आहे. त्यामुळे तो स्वतःच्या बळावर भूमिका मिळवू शकतो. त्यासाठी माझी आवश्यक्ता नाही. हॉलीवूडमध्ये स्थायिक होण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे सांगून, मी बॉलीवूडमध्येच रहाणार असल्याचेही तिने स्पष्ट केले.

No comments:
Post a Comment