मुले देवाघरची फुले असं म्हटलं जातं. मुले अळवावरच्या पाण्यासारखी पारदर्शक आणि पान झुकेल तिकडे घरंगळत जाणाऱ्या बिंदूंसारखी असतात. पण मुलांना त्यांचं बालपण तितक्या नैसर्गिकपणे जगण्याचा काळ आता राहिला नाही. स्पर्धात्मक जगात मूल एक उत्पादन झालं आहे, जे सगळ्या क्षेत्रात चमकलं पाहिजे, अशी पालकांची अपेक्षा असते. पालकांचा महत्त्वाकांक्षी स्वभाव आणि स्पर्धात्मक मानसिकतेने या मुलांचे मूलपण चुरगाळून टाकले आहे. त्यामुळे या लहानग्यांच्या मनाचा थांग घेतलाच जात नाही. त्यांना काय वाटते? ते काय करू इच्छितात? त्यांची स्वप्न काय आहेत?
नेमक्या याच प्रश्नांना अमिर खानने त्याच्या तारे जमीं पर या चित्रपटात स्पर्श केला आहे. चित्रपटाच्या प्रोमोजमधून हा मुलांसाठीचा चित्रपट वाटण्याची दाट शक्यता आहे. पण तसे समजण्याची चुक करू नका. हा मुलांचा, पालकांचा, शिक्षकांचा आणि पर्यायाने समाजासाठीचाच चित्रपट आहे. कारण या प्रत्येक घटकासाठी यात काही ना काही आहे, जे त्याला विचार करायला भाग पाडेल.
इशान अवस्थी (दर्शील सफारी) या आठ वर्षाच्या मुलाचे मन अभ्यासापेक्षा कुत्रा, मासे आणि चित्रकला यात अडकले आहे. पण त्याचे आई-वडील त्याला सारखे अभ्यास कर अभ्यास कर असे टुमणे लावत असतात. पण इशानला मनापासून ते करावेसे वाटत नाही. त्यामुळे आई-वडिल आणि शिक्षकांची बोलणी खाणे हे त्याच्या आयुष्यातील नैमित्तिक काम बनते. त्याला सुधारण्यासाठी अखेर आई- वडिल त्याला निवासी शाळेत (बोर्डींग स्कूल) टाकण्याचा निर्णय घेतात.
हसता खेळता इशान तेथे गेल्यावर कोमेजून जातो. उदास होतो. पण त्याचवेळी शाळेत नवीन आलेले कलाशिक्षक रामशंकर निकुंभ (अमिर खान) यांचे त्याच्याकडे लक्ष जाते. ते त्याच्या उदासपणाचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांच्या लक्षात येते, की इशान प्रतिभावंत आहे, पण त्याला डिसलेक्सिया नावाचा आजार आहे. त्यामुळे त्याला वाचण्यात अडचण येते. त्यानंर मग त्याला प्रेम, जिव्हाळा देऊन निकुंभ सर त्याच्यात दडलेली हुषारी सर्वांच्या समोर आणतात.
कथा अतिशय सोपी, सरळ आहे. ती पडद्यावर सादर करायलाही तितकीच कठीण आहे. पण अमिरने त्याच्या दिग्दर्शकीय पदार्पणातच त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने पडद्यावर सादर केले आहे. पटकथा अतिशय बांधीव आहे. त्यामुळे इकडे तिकडे भरकटायचा प्रश्नच येत नाही. छोट्या छोट्या प्रसंगातून प्रेक्षकांच्या ह्रदयाला हात घालण्यात ती यशस्वी ठरते.
इशानचे शाळा सोडून रस्त्यावर भटकत रहाणे, ताजी हवा भरभरून श्वासात घेणे, इमारती रंगीत होताना पहाणे, फुटपाथवर रहाणारी मुले कोणत्याही दडपणाविना मुक्तपणे खेळत असलेली पहाणे, बर्फाचा लाडू खाणे ही सारी लहानपण दर्शविणारी दृश्ये पाहिल्यावर कुणालाही आपले बालपण आठवेल.
इशानचे शाळा सोडून रस्त्यावर भटकत रहाणे, ताजी हवा भरभरून श्वासात घेणे, इमारती रंगीत होताना पहाणे, फुटपाथवर रहाणारी मुले कोणत्याही दडपणाविना मुक्तपणे खेळत असलेली पहाणे, बर्फाचा लाडू खाणे ही सारी लहानपण दर्शविणारी दृश्ये पाहिल्यावर कुणालाही आप
ले बालपण आठवेल.
पण त्याचबरोबर आपली स्वप्ने मुलाच्या डोळ्यातून पाहणारे, आपल्या महत्त्वाकांक्षा मुलांवर लादणाऱ्या आई-बापांनाही ही कथा आत्मपरिक्षण करायला लावते. मुलांवर आपल्या महत्त्वाकांक्षा लादणे बालकामगारापेक्षा वाईट आहे, यासारखे संवाद पालकांनाही विचार करायला भाग पाडतात.
काही प्रसंगही छान गुंफले आहेत. इशान टेनिस स्पर्धेच्या एका अंतिम सामन्यात हरतो. त्यावेळी त्याचे वडील त्याला खूप बोलतात. पण तोपर्यंतच्या त्याच्या प्रवासासाठी त्याच्या पाठीवर शाबासकी देत नाहीत. उलट बोलून त्याच्या कष्टांवर पाणी फिरवतात.
हा चित्रपट पालकांना अंतर्मुख करतो. अनेक प्रश्न विचारतो. त्यांनी मुलांना केवळ त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जन्म दिला आहे का? आयुष्यात त्यांना जे व्हायचे ते स्वतः झाले का? नसतील झाले तर त्याचा राग मुलांवर काढण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? मुळात मुलाचा कल काय याचा त्यांनी विचार केला का? असे अनेक प्रश्न पालकांना हा चित्रपट नकळत विचारतो.
संवादाच्या माध्यमातून अमिरने हे प्रश्न विचारले आहेत. पण चित्रपट उपदेशपर किंवा काही तरी संदेश देण्याच्या अविर्भावत तयार करण्यात आलेला नाही. चित्रपट पाहतानाच प्रेक्षक आपोआप अंतर्मुख होतात. त्यानंतर ते नक्कीच आपल्या मुलांना अधिक चांगल्या पद्दतीने समजावून घेऊ शकतील.
इशान झालेला दर्शील सफारीने कल्पनातीत काम केले आहे. तो अभिनय करतो असे वाटत नाही, एवढी सफाई त्याच्या कामात आहे. लहान मुलांचे सर्व भाव त्याच्या चेहऱ्यावर इतके छान दिसतात, की त्याच्या क्षमतेचे आश्चर्य वाटते. हसता खेळता इशान राग, लोभ, जवळीक, उदासपण या भावनाही तितक्याच चांगल्या रितीने व्यक्त करतो.
अमिर खान तर मध्यंतरानंतर चित्रपटात येतो आणि प्रभावी ठरतो. टिस्क चोप्राने (इशानची आई) आईपण छान सादर केले आहे. विपिन शर्मा (इशानचे वडील), सचेत इंजिनियर यांचेही काम छान आहे.
कोणत्याही तयारीविना दिग्दर्शकीय आखाड्यात उतरलेल्या आमिरने आपण एक चांगले दिग्दर्शक आहोत, हे दाखवून दिले आहे. या माध्यमावरची त्यांची पकड असल्याचे जाणवते. फालतू म्हणावं असे या चित्रपटात काहीही नाही. मुलांवरही एक चांगला चित्रपट बनविता येतो आणि तो बालचित्रपट नसतो हे त्याने दाखवून दिले आहे. खटकण्यासारखी बाब एकच आहे, ती म्हणजे चित्रपटाची लांबी. ती थोडी जास्त असल्यासारखी वाटते, इतकंच.
चित्रपटातील गाणीही छान, अर्थवाही आहेत. तशा
च चालीही शंकर-एहसान-लॉय यांनी दिल्या आहेत. पडद्यावर पाहताना त्यांचा प्रभाव आणखी वाढतो. छायाचित्रणही उल्लेखनीय.
हा चित्रपट आवर्जून पाहिला पाहिजे. पालकांनी तर अगदी आवर्जून पाहिला पाहिजे. अगदी मुलांबरोबर जाऊन. मुलाला समजून घेण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
नेमक्या याच प्रश्नांना अमिर खानने त्याच्या तारे जमीं पर या चित्रपटात स्पर्श केला आहे. चित्रपटाच्या प्रोमोजमधून हा मुलांसाठीचा चित्रपट वाटण्याची दाट शक्यता आहे. पण तसे समजण्याची चुक करू नका. हा मुलांचा, पालकांचा, शिक्षकांचा आणि पर्यायाने समाजासाठीचाच चित्रपट आहे. कारण या प्रत्येक घटकासाठी यात काही ना काही आहे, जे त्याला विचार करायला भाग पाडेल.
इशान अवस्थी (दर्शील सफारी) या आठ वर्षाच्या मुलाचे मन अभ्यासापेक्षा कुत्रा, मासे आणि चित्रकला यात अडकले आहे. पण त्याचे आई-वडील त्याला सारखे अभ्यास कर अभ्यास कर असे टुमणे लावत असतात. पण इशानला मनापासून ते करावेसे वाटत नाही. त्यामुळे आई-वडिल आणि शिक्षकांची बोलणी खाणे हे त्याच्या आयुष्यातील नैमित्तिक काम बनते. त्याला सुधारण्यासाठी अखेर आई- वडिल त्याला निवासी शाळेत (बोर्डींग स्कूल) टाकण्याचा निर्णय घेतात.
हसता खेळता इशान तेथे गेल्यावर कोमेजून जातो. उदास होतो. पण त्याचवेळी शाळेत नवीन आलेले कलाशिक्षक रामशंकर निकुंभ (अमिर खान) यांचे त्याच्याकडे लक्ष जाते. ते त्याच्या उदासपणाचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांच्या लक्षात येते, की इशान प्रतिभावंत आहे, पण त्याला डिसलेक्सिया नावाचा आजार आहे. त्यामुळे त्याला वाचण्यात अडचण येते. त्यानंर मग त्याला प्रेम, जिव्हाळा देऊन निकुंभ सर त्याच्यात दडलेली हुषारी सर्वांच्या समोर आणतात.
कथा अतिशय सोपी, सरळ आहे. ती पडद्यावर सादर करायलाही तितकीच कठीण आहे. पण अमिरने त्याच्या दिग्दर्शकीय पदार्पणातच त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने पडद्यावर सादर केले आहे. पटकथा अतिशय बांधीव आहे. त्यामुळे इकडे तिकडे भरकटायचा प्रश्नच येत नाही. छोट्या छोट्या प्रसंगातून प्रेक्षकांच्या ह्रदयाला हात घालण्यात ती यशस्वी ठरते.
इशानचे शाळा सोडून रस्त्यावर भटकत रहाणे, ताजी हवा भरभरून श्वासात घेणे, इमारती रंगीत होताना पहाणे, फुटपाथवर रहाणारी मुले कोणत्याही दडपणाविना मुक्तपणे खेळत असलेली पहाणे, बर्फाचा लाडू खाणे ही सारी लहानपण दर्शविणारी दृश्ये पाहिल्यावर कुणालाही आपले बालपण आठवेल.
इशानचे शाळा सोडून रस्त्यावर भटकत रहाणे, ताजी हवा भरभरून श्वासात घेणे, इमारती रंगीत होताना पहाणे, फुटपाथवर रहाणारी मुले कोणत्याही दडपणाविना मुक्तपणे खेळत असलेली पहाणे, बर्फाचा लाडू खाणे ही सारी लहानपण दर्शविणारी दृश्ये पाहिल्यावर कुणालाही आप
ले बालपण आठवेल.पण त्याचबरोबर आपली स्वप्ने मुलाच्या डोळ्यातून पाहणारे, आपल्या महत्त्वाकांक्षा मुलांवर लादणाऱ्या आई-बापांनाही ही कथा आत्मपरिक्षण करायला लावते. मुलांवर आपल्या महत्त्वाकांक्षा लादणे बालकामगारापेक्षा वाईट आहे, यासारखे संवाद पालकांनाही विचार करायला भाग पाडतात.
काही प्रसंगही छान गुंफले आहेत. इशान टेनिस स्पर्धेच्या एका अंतिम सामन्यात हरतो. त्यावेळी त्याचे वडील त्याला खूप बोलतात. पण तोपर्यंतच्या त्याच्या प्रवासासाठी त्याच्या पाठीवर शाबासकी देत नाहीत. उलट बोलून त्याच्या कष्टांवर पाणी फिरवतात.
हा चित्रपट पालकांना अंतर्मुख करतो. अनेक प्रश्न विचारतो. त्यांनी मुलांना केवळ त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जन्म दिला आहे का? आयुष्यात त्यांना जे व्हायचे ते स्वतः झाले का? नसतील झाले तर त्याचा राग मुलांवर काढण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? मुळात मुलाचा कल काय याचा त्यांनी विचार केला का? असे अनेक प्रश्न पालकांना हा चित्रपट नकळत विचारतो.
संवादाच्या माध्यमातून अमिरने हे प्रश्न विचारले आहेत. पण चित्रपट उपदेशपर किंवा काही तरी संदेश देण्याच्या अविर्भावत तयार करण्यात आलेला नाही. चित्रपट पाहतानाच प्रेक्षक आपोआप अंतर्मुख होतात. त्यानंतर ते नक्कीच आपल्या मुलांना अधिक चांगल्या पद्दतीने समजावून घेऊ शकतील.
इशान झालेला दर्शील सफारीने कल्पनातीत काम केले आहे. तो अभिनय करतो असे वाटत नाही, एवढी सफाई त्याच्या कामात आहे. लहान मुलांचे सर्व भाव त्याच्या चेहऱ्यावर इतके छान दिसतात, की त्याच्या क्षमतेचे आश्चर्य वाटते. हसता खेळता इशान राग, लोभ, जवळीक, उदासपण या भावनाही तितक्याच चांगल्या रितीने व्यक्त करतो.
अमिर खान तर मध्यंतरानंतर चित्रपटात येतो आणि प्रभावी ठरतो. टिस्क चोप्राने (इशानची आई) आईपण छान सादर केले आहे. विपिन शर्मा (इशानचे वडील), सचेत इंजिनियर यांचेही काम छान आहे.
कोणत्याही तयारीविना दिग्दर्शकीय आखाड्यात उतरलेल्या आमिरने आपण एक चांगले दिग्दर्शक आहोत, हे दाखवून दिले आहे. या माध्यमावरची त्यांची पकड असल्याचे जाणवते. फालतू म्हणावं असे या चित्रपटात काहीही नाही. मुलांवरही एक चांगला चित्रपट बनविता येतो आणि तो बालचित्रपट नसतो हे त्याने दाखवून दिले आहे. खटकण्यासारखी बाब एकच आहे, ती म्हणजे चित्रपटाची लांबी. ती थोडी जास्त असल्यासारखी वाटते, इतकंच.
चित्रपटातील गाणीही छान, अर्थवाही आहेत. तशा
च चालीही शंकर-एहसान-लॉय यांनी दिल्या आहेत. पडद्यावर पाहताना त्यांचा प्रभाव आणखी वाढतो. छायाचित्रणही उल्लेखनीय.हा चित्रपट आवर्जून पाहिला पाहिजे. पालकांनी तर अगदी आवर्जून पाहिला पाहिजे. अगदी मुलांबरोबर जाऊन. मुलाला समजून घेण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
निर्माता- दिग्दर्शक- अमिर खानगीतकार- प्रसून जोशीसंगीत- शंकर-एहसान-लॉयकलावंत- अमिर खान, दर्शील सफारी, टिस्का चोप्रा, विपिन शर्मा, सचेत इंजिनियर.
No comments:
Post a Comment