
(कर्टेसी: वेब दुनिया)
जॉन अब्राहमचा वाढदिवस सोमवारी झाला. सध्या युवकांची त्यातही मुलींची धडकन असणारा जॉन समाजाप्रती संवेदनशीलही आहे, हे फार कमी जणांना ठाऊक आहे. अनेक सामाजिक कामात त्याचा सहभाग असतो. त्याने आपल्या काही सहकाऱ्यांच्या साथीने देशातील काही गावांत पाच हजार घरे बांधली आहेत. विशेष म्हणजे ही घरे अतिशय दुर्गम भागात आहेत. जॉन म्हणतो, की माझे फिल्मी जग आणि सामाजिक कार्य या दोन्हीत मी अंतर राखून आहे. चित्रपटातून वेळ मिळाला की मी या कामात लक्ष घालतो. प्राण्यांच्या प्रती प्रेम असल्याने पेटासाठी काम करतो. जॉनची स्वतःची एक संस्था आहे, ती जॉन ब्रिगेड या नावाने ओळखली जाते. हॅबिटेट फॉर ह्युमनिटी या अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या संस्थेसाठी काम करते. पुढच्या वर्षी जॉनची निराश्रितांसाठी आठ हजार घरे बांधण्याची योजना आहे. या कामात युवकांनी जास्तीत जास्त सहभाग द्यावा अशी जॉनची इच्छा आहे. युवकांनी पुढे येऊन घरे बांधण्याच्या कामात सहकार्य करावे असे त्याला वाटते. थोडं त्याच्या चित्रपटाविषयी. करण जोहरच्या एका चित्रपटात जॉनने काम केले आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. ही छान मनोरंजन करणारी कॉमेडी आहे. दीपा मेहता यांच्या लूनातही तो काम करतो आहे. शिवाय श्रीराम राघवन यांच्या हॅपी बर्थ डे मध्येही तो आहे.
No comments:
Post a Comment